Blog Detail

Home Detail

ग्रामसेवक शंकर चिकटूळ यांना राजर्षी शाहू आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

न्यूज लोकशाही भारत नेटवर्क 

पुणे: गेल्या 17 ते 18 वर्षातील ग्रामपंचायतमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी, जावली व पारपारचे ग्रामसेवक श्री. शंकर चिकटूळ यांना शुक्रवार दि. 16 फेब्रुवारी रोजी राजर्षी शाहू आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, गंजपेठ पुणे येथे दक्ष मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित आदर्श सरपंच व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोहळ्यात मा. रुपालीताई चाकणकर, राज्य महिला आयोग अध्यक्ष, राज्य मंत्री दर्जा, यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ग्रामपंचायत मध्ये ISO प्रमाणपत्र मिळवणे, वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान, स्मार्ट ग्राम, निर्मल ग्राम, दिन दयाळ पंचायत शशक्तीकरण अभियान, कर वसुलीत अग्रेसर, ऑनलाईन कामकाज अशा सर्वच कामांमध्ये श्री. चिकटूळ यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

यापूर्वी देखील जिल्हा परिषद व राज्य शासनाने त्यांना गौरवण्यात आले आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा राजर्षी शाहू प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा. श्री. भगवान श्रीमंदीलकर यांनी पुरस्कार निवडीचे स्वागत करताना श्री. चिकटूळ यांच्या कामाचे कौतुक केले.

पुरस्कारामुळे माझ्यावर अधिकची जबाबदारी वाढल्याचे मत ग्रामसेवक श्री. शंकर चिकटूळ यांनी व्यक्त केले.

Leave A Comment

;