Blog Detail

Home Detail

थेरगाव पुणे येथील राजर्षी शाहु प्रतिष्ठानचा महाराष्ट्र आयडाॕल पुरस्कार सरपंच सौ.जनाबाई नरहरी काकडे यांना जाहीर

 

थेरगाव पुणे येथील राजर्षी शाहु प्रतिष्ठान,दक्ष मराठी पञकार संघ व महाराष्ट्र राज्य जागृत शोध वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमानेस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त राजर्षी शाहु आदर्श सरपंच पुरस्कार -२०२४ यापुरस्कारांचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये विभागातील ५० उत्कृष्ट काम करत असलेल्या सरपंच महाराष्ट्र आयडाॕल पुरस्कार-२०२४ देऊन गौरवण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी केज तालुक्यातील साबला येथील महीला सरपंच सौ.जनाबाई नरहरी काकडे यांची निवड करण्यात आलेली आहे.या पुरस्कारामध्ये म्हटले आहे की,आपण महाराष्ट्र आयडाॕल पुरस्कार -२०२४ या पुरस्कारा साठी आपण पाञ आहात असे त्यांनी घोषीत केले असुन आपले कार्य दिपस्तंभाप्रमाणे असुन या पुरस्कार सोहळ्यासाठी कुटुंब,मिञ परिवार, स्नेहजन यांनाही आमंञीत करण्यात आले आहे.दरम्यान त्यांना मिळालेल्या पुरस्कारा विषयी प्रतिनिधीशी वार्तालाप करताना सरपंच  सौ.जनाबाई काकडे यांनी हा पुरस्कार मिळाला असल्याचा आपल्याला आनंद होत असुन याचे श्रेय त्यांचे पती आदर्श शिक्षक श्री.नरहरी काकडे साबला ग्रामस्थ तसेच कर्मचारी व पञकार बांधवांना दिले आहे. दरम्यान त्यांनामिळालेल्या  पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

 

Leave A Comment

;